Wednesday, July 12, 2023

Hrudyacha Pail Tiravar - हृदयाच्या पैलतीरावर


Hrudyacha Pail Tiravar

हृदयाच्या पैलतीरावर


Hrudyacha Pail Tiravar -  हृदयाच्या पैलतीरावर

    

              प्रेम ही अशी अमूर्त संकल्पना आहे की जी जेव्हा घडते तेव्हा त्याचा थांग पत्ताही आपणास लागत नाही Hrudyacha Pail Tiravar हृदयाच्या पैलतीरावर या कवितेतून ते तुम्ही नक्की अनुभवाल अस जर कुणी म्हणतं असेल की मी कधीच प्रेमात पडलो नाही तर तो नक्कीच खोटं बोलतोय अस आपण सांगू शकतो. जीवनात ईश्वराने दिलेली ही एक अशी देणगी आहे ज्यामुळे मानव रुपी वृक्षाला हिरवी पालवी फुटते आणि मग तिच्या किंवा त्याच्या अल्लड वागणे ही आपल्याला फक्त एकच वस्तू दिसते ते म्हणजे प्रेम...अश्याच अल्लड प्रेमाला मी शब्दबध्द केले आहे या कवितेतून.... 

         
हृदयाच्या पैलतीरावर 
सरसर तुझीच आठवन
गोड वेदना अंतरी रे
हृदयात तुझीच साठवण

मुक्त गात मी फिरते 
ओठांवर तुझेच गाणे
अजुनी आठवते मजला 
चोरुन तुझे ते पाहणे

अल्लड वागणे माझे 
मन भरून तू हे पाही
भिजलेल्या केसांन सवे 
मी बाहुत तुझ्या रे येई 
 

 

✍️ मनोज इंगळे 


 

 Hrudyachya pail tiravar

Sarsar tuzhich aathvan

God vedana antarire

Hrudyat tuzhich sathvan


Mukt gaat mi firte

Othanvar tuzhech gaane

Aajuni aathavte majla

Chorun tuzhe te pahane


Allada vagne mazhe 

Man bharun tu he pahi

Bhijlelya kesan save 

Mi bahut tuzhya re yeyi. 


Manoj ingle








No comments:

Post a Comment