आसक्तजिवन | Asakt_Jivan
सुकुमार उमलले मी आज कलिका
घेऊनी ऊन वारा अंगा वरी या
हसले गुलाबी आनंदी करण्या जगाला
आजन्म उधळून सुगंध हृदयातला
कुणी घेतले सुगंध घेण्या जवळ मला
कुणी मजला तोडुनी दिल्या अविरत कळा
तरी उमलत मी राहली हृदयातल्या
एक एक सुगंधी या पाकळ्या
मी दिले सर्व सर्वस्व जगा या
संपवून स्वताच्या सर्व या भावना
अविरत मी जगले आसक्त होउन
का कळल्या न जगाला विवेचना
- मनोज इंगळे
No comments:
Post a Comment