आत्महत्या | Aatmhatya
मनात न दिसणारी असंख्य बोचणारी क्षुल होती
आत्महत्या करणे ही खरंच माझी भूल होती
खरंच आत्महत्या करणे गरजेचे होतें का?
दुसऱ्याच्या जीवनात काही वादळच नव्हते का?
मी माझ्या जीवात खरंच खूप सुखी होतो
प्रत्येक क्षणाला जगणारा बहुमुखी होतो
पण एक टोकाचा निर्णय मला खूप भारी पडला
चवऱ्यांशी योनी नंतर मिळालेला देह अग्नित जळला
घर परिवार पैसा अदला सगळेच मुबलक होतें
नजर लागेल सगळ्यांची इतके जीवन सुबक होतें
पण विचारांना अविचाराची कधी जोड लागली
सुखी संपन्न जीवनाला रागाची कीड लागली
खरंच घरात कुणाच्या कधीच भांडण होत नाही का
पुन्हा जीवनातील साचलेले पाणी खळाळून वाहत नाही का
खुश होतो मी जीवन खूप सुखात जातं होतें
सुख दुःख जीवनात लपंडाव करून वळून पाहत होतें
पण माझ्या रागावरच माझा ताबा नव्हता
समजावून सांगणारा असा कुणी बाबा नव्हता
म्हणून ठरवलं एकदाचा अंतिम निर्णय घेऊ
आत्महत्या करून सगळ्या टेंशनलाच संपवू
स्वतः ला आरश्यात पाहणारा देह गोठला होता
माझ्या परिवारावर काळाकुट्ट ढग फाटला होता
बायको रडत होती की, मी काय चूक केली
यांच्या मृत्यू पहिले मीच काऊंन नाही मेली
मुलं माझी कावरी बावरी मृतदेहला पाहत होती
खूप जोरात रडून रडून चूप राहत होती
त्यांना हे सर्व काय झाले काही कळत नव्हते
माझ्या समोर माझ्या परिवारचे सुकुमार फुल जळत होते
माझी आई खूप हंबरडा फोडून रडत होती
उठ ना रे राजा म्हणून माझा हात चोळत होती
बाबा मात्र ओरडत नव्हते ते शांत होतें
त्यांच्या मनात मात्र न संपणारे आकांत होतें
खरंच मी काय केले होतें मला माझी चूक कळली होती
आत्महत्येच्या मार्गांवर माझी पाऊले का पडली होती
राग हा क्षणिक असतो त्याला मनात थारा देऊ नका
जीवनात येणाऱ्या संकटाला तुम्ही मात्र भिऊ नका
जिथे जेव्हा जेव्हा तूम्हाला जीवनात समस्या येतील
तेव्हा तेव्हा त्या तुमच्या जीवनाला नवी कलाटणी देतील
म्हणून जीवनात टोकाची भूमिका तुम्ही खरंच घेऊ नका
खरंच जीवन असेल खडतर पण जगण्याला भिऊ नका
मनोज इंगळे
No comments:
Post a Comment