तू दूर ना जावे असे वाटते | Tu door bna jaave ase vatte
तु दूर ना जावे असे वाटते
असे वाटण्याची भीती वाटते
तु जपावे फुले सवे मला
कुठे खोल आत लपवावे मला
कुणाचं ना दिसावे असे वाटते
असे वाटण्याची भीती वाटते
तु असावे समीप सदा
ह्रुदयात ही जागा रीती वाटते
दूर ना जावे मला सोडून
एकटे पणाची भीती वाटते
प्रेम आहे हे ह्रुदयात हे मग
सतत हे रक्त का आटते
परत तु येशील असे का वाटते
ह्रुदयात खोल तुझे प्रेम का दाटते
तु नसतात कुणीच मग का नसे
कुणी ही नसण्याची भीती वाटते
परत शब्द बनुनी मला ओठात घे
तुला बघेल अश्या या नजरेत ये
ह्रुदयात तुझे प्रेम का साठते
पण तुला बोलण्याची भीती वाटते
मनोज इंगळे
No comments:
Post a Comment