जल धारा | Jal dhara | पाऊस | Paus
टपटप सरसर झाडा वरती
पडती या जलधारा
सरसर झाडा मधून वाहे
मोहक सुगंधी हा वारा
पाना फुलांचे अजब ही
लगबग मोत्याना धरण्याची
वाऱ्याच्या झुळका मधूनी
गंध फुलांचा भरण्याची
झाडा वरती सरसर चढती
हिरव्या नगिनीचे वेल
सप्त सुरणी आकशा वरती
गाणे गातेरांगाचे बोल
पर्ण कीटक हे पांघरती
मृदू छायेचे अनामिक बोल
पक्ष्यांच्या पंगत उठता बसता
सावरती आपला हा तोल
सरसर टीप टीप पण्यावर्ती
ब्रम्ह नांद हा आवळती
पात्याच्या त्या फळ पानांनी
ढोल मंजिरे वाजवती
नदीच्या पण्या वरती
उठती ही निनादित तरंगे
बाल गोपाळ उड्या मारीती
सवंगड्याच्या संगे
निसर्गाची ही सर्वत्र पसरली
माणुसकीची ही दाटी
पावसाच्या या आगमनाने
तृप्त होऊनी चातक गाती
मनोज इंगळे
No comments:
Post a Comment