Thursday, April 6, 2023

अस्तित्वाचे प्रश्न - Astitvache prashna

अस्तित्वाचे प्रश्न


 जीवनात कधी कधी आपण स्वताच्या प्रश्नात असे गुरफटलेले असतो की आपले अस्तित्व त्या कोळ्यातील जाळ्यात अडकलेल्या फुलपाखरा सारखे होऊन जाते आणि आपण आपल्यालाच अनेक प्रश्न विचारत असतो...


स्वतःच्याच उत्तराना पुन्हा पुन्हा 
फिरून प्रश्न करते मी
खूप साऱ्या उरलेल्या त्या
प्रश्नांना परत पुरून उरते मी

जीवनाचे खूप प्रश्न सोडले 
मात्र सुटता सुटत नाही
उत्तर असतात खूप पण
ओठी शब्दाचं फुटत नाही

आपल्याच आस्तित्व 
सिद्धीस मी स्वतः लढते
घडायचे नस्ते ते जे तेच
माझ्या मना विरुद्ध घडते

कधी कधी एकटीच मी 
मनात खूप विचार करते
आपल्या जखमी मनाला
शस्त्राच्या धारेवर धरते

पण तरी प्रश्न असतात
माझ्याकडे एक टक लाऊन
एकटीच असते मात्र खूप चेहरे 
येता जाता जातात मला पाहून

अपेक्षांचे ओझे वाहून मी 
आता खूप थकले
जगण्याच्या हिशेबाचे 
गणित मात्र चुकले 
✍️मनोज इंगळे 


Svataḥcyāca uttarānā punhā punhā 

phirūna praśna karatē mī

khūpa sāṟyā uralēlyā tyā

praśnānnā parata purūna uratē mī


jīvanācē khūpa praśna sōḍalē 

mātra suṭatā suṭata nāhī

uttara asatāta khūpa paṇa

ōṭhī śabdācaṁ phuṭata nāhī


āpalyāca āstitva 

sid'dhīsa mī svataḥ laḍhatē

ghaḍāyacē nastē tē jē tēca

mājhyā manā virud'dha ghaḍatē


kadhī kadhī ēkaṭīca mī 

manāta khūpa vicāra karatē

āpalyā jakhamī manālā

śāstrācyā dhārēvara dharatē


paṇa tarī praśna asatāta

mājhyākaḍē ēka ṭaka lā'ūna

ēkaṭīca asatē mātra khūpa cēharē 

yētā jātā jātāta malā pāhūna


apēkṣān̄cē ōjhē vāhūna mī 

ātā mī khūpa thakalē

jagaṇyācyā hiśēbācē 

gaṇita mātra cukalē 

✍️manoj Ingle 








No comments:

Post a Comment