Friday, August 11, 2023

Tichi mazhi duniyadar तिची माझी दुनियादारी

       Poem,shayri,love status, love quotes
    Tichi mazhi duniyadari तिची माझी दुनियादारी 
  
    

Poem,shayri,love status, love quotes      Tichi mazhi duniyadari तिची माझी दुनियादारी

           पती-पत्नीच्या नात्यातील प्रेमळता आणि आपसी संवाद मानसिक आणि भावनांच्या मजबूत आधारावर असतात. परस्परांच्या सवयीच्या समजण्यातील सामंजस्य, समर्पण, विश्वास, आणि सहाय्याच्या भावनांची आपसी पाळणी करण्यातून त्यातल्या नात्याची मजबूती आणि प्रेमळता वाढतात. दोन्हीकडून सामंजस्यता, सामंजस्यपूर्ण संवाद, आणि पारस्परिक समर्थन आपल्या नात्याच्या प्रेमळतेचे महत्वपूर्ण कारक आहेत. पती-पत्नी सबंध हे फार वेगळे आणि बहुरंगी असतात ते रंग अनुभवण्या करिता तुम्हाला प्रेमाच्या सरी आणि मायेची ऊब असणे आवश्यक आहे तेव्हाच पती पत्नी या नात्यातील बहुरंगी इंद्रधनुष्य तुम्हाला दृष्टिगत होईल.

तिचे बोलणे माझे बोलणे 
केवळ म्हणजे शब्द कहानी
रोजच्या होणाऱ्या चुका अश्या
तिची नवीन हसरी बहानी

 मी नसताना घरी मग तिची ती 
आतुरतेने अविरत वाट पहाने 
माझ्या साठी नजरेत ओलावा
 दारा मध्ये सतत उभे राहाणे 

सोबत असताना रोज रोज
ना संपणार अश्या तक्रारी
पण दूर असताना तीच जीवनाची
अमीट माझी घट्ट ही यारी

तिचे हसणे उत्सव हा जणू
तिची प्रत्येक अदा ही भारी 
 मी तर आहे तिच्या मुळे हा
तीच जगण्याची दुनियादारी 

मनोज इंगळे 

Tiche bolne mazhe bolne 
mhanje keval shabd kahani
Rojchya honarya chuka ashya 
tichi navin  hasri bahani 

Mi nastayana tiche mag te 
aturtene vaata pahane
Mazhyasathi najaret olava 
Dara madhe satat ubhe rahane 

Sobat astatana roj roj 
nasampnar asha takrari
Pan dur Astana tich jivnachi 
Amit mazho ghatt hi yari

Tiche hasne utsav ha janu
Tichi pratek Ada hi bhari
Mi tar aahe tichyamule ha
Tich jagnyachi duniyadari

Manoj ingle 


No comments:

Post a Comment