Tuesday, December 5, 2023

सौंदर्य _Saundarya Kavya_ सुंदरता_ Beautiful

सौंदर्य | सौंदर्य काव्य | प्रेम काव्य |Saundarya Kavya | Prem Kavya |Prem kavta 


सौंदर्य | सौंदर्य काव्य | प्रेम काव्य |Saundarya Kavya | Prem Kavya |Prem kavta


 चित्र कविता 

            प्रत्येक स्त्री ही नानाविध गुणांनी आणि सौंदर्यानी नटलेली असते. त्या सौंदर्याचे वर्णन आपणास अनेक काव्य आणि लेखातून प्रतीत होताना दिसून येईल याचे कारण असे आहे की, स्त्रियांना सृजनशीलतेचे प्रतीक म्हणून संबोधण्यात येते.

            पौराणिक अनेक कथा, कादंबरी,काव्य यामध्ये आपणास स्त्रियांचे नखशिखांत वर्णन केलेले आपणास आढळून येणार त्याचे एकमेव कारण हे स्त्रियांचे सौंदर्य आहे जे साहित्य सृजनतेला मदत करत असतात. 

              या काव्यात ही स्त्रियांच्या या सौंदर्याचे वर्णन आपल्याला दिसून येईल आपल्याला ते नक्कीच आवडेल.


कुंतलांचा असा हा प्राण फास आहे

मनात अजूनही पेटती तुझी आस आहे

तुझ्या या वागण्याच्या मोहक अदा या

आठवती भास बनुनी अवीरत सदा या

तुझे नेत्र खेळती खेळ अल्लढ पणाने

मन तुझ्यात हरवते मग अमूर्त मनाने

तुझे हे नटने जरी हा रोजचा खेळ आहे

पण माझा कटाक्षाने पाळणे हा वेळ आहे

तुझ्या पाठमोऱ्या या आकृतीस मी पाहतो

मनात तुझ्या आठवणी साठवून मग राहतो

© मनोज इंगळे


Kuntalacha asa ha pran faas aahe

Manat ajuni perati tuzhi AAS aahe

Tuzhya ya vaganyachya mahak aada ya

Aathavti bhas banuni avirat sada ya

Tuzhe netr khelati khel alladh panane

Man tuzhyat haravte mag amurt Manane

Tuzhe he nayane rojacha khel aahe

Pan mazh katakshane palane ha vel aahe

Tuzhya paathmorya ya aakrutis mi pahto

Manat tuzhya aathavani sathvun mag rahto

© Manoj Ingle 



No comments:

Post a Comment