माय,आई,जन्मदात्री | Maay Aai, Janmadatri

माय,आई,जन्मदात्री | Maay Aai, Janmadatri


माय,आई,जन्मदात्री | Maay Aai, Janmadatri

 आई या शब्दातच अखंड ब्रम्हांड व्यापलेले आहे . आई म्हणजे विश्व आहे. देवाला एकदा नारदाने विचारले की देवा तुम्ही चराचरात व्यापलेले आहात तेव्हा तुम्ही कलयुगात कोणत्या रुपात अवतरीत व्हाल तेव्हा देवाणे उत्तर दिले कलयुगात आम्ही तर अमृत प्राशनाने अमर झालो परतु मानवाला जे लाभले ते आम्हाला नाही . ती म्हणजे आई तीने भरवीलेला एक एक घास म्हणजे अमृत आहे. ज्याच्या जवळ त्याची आई असेल त्याला माझी काय गरज ..... म्हणुन ज्याच्या जवळ ईश्वराणे दिलेला अमृत ठेवा आहे त्याला जगात कशाचीच कमी नाही.

आई वर ही माझी लहानशी रचना.....

माय अमृताची धार
सर्व जगाचा आधार
माय सरलेला काय
माय दुधावरची साय

माय हिरवेगार पाते
 माय प्रेमाचे हे नाते
माय संसाराचे गाडे
माय हिरवेगार झाडे

माय माउली आधार
ऊन लागला धरी पदर
माय अमृताची कण
पिल्लासाठी वणवण

माय सोन्याचे परिस
माय चविष्ट गरिष्ठ
माय जगण्याची रे गती
माय बुध्दीची रे मती

माय पाऊस हा शांत
माय. विसावा हा शांत
माय म्हणजे रे भाकर
माय दही दूध साखर

माय कोवळे ते ऊन 
माय प्रांजळ हे मन
माय देऊळ कळस 
नाही करत आळस

माय माय म्हणजे माय
तिच्या वीणा कुणी न्हाय
जेव्हा जाती ती सोडून
मन कोमेजून जाय

मनोज इंगळे 








No comments

Powered by Blogger.