शरीरातील प्राण Shariratil pran
शरीरातील प्राण Shariratil pran
मरणास जीव माझा
आता अधीर झाला
जेव्हा माझ्या कडे ग
तू नसण्याचा निरोप आला
तू नाही म्हणून मी ही
नसण्याचा बेत केला
तू दिलेल्या वाचनाने मला
जगण्यास धीर दिला
सखे ग प्रियंवदा तू
शरीरातील प्राण होती
तुझ्या आठवणीत माझे
अश्रू बनलेत मोती
मनात पेटले ग माझ्या
अगणित धग आता
स्वर एकटेच राहिले
तुझ्यासवे गीत गाता
माझी होती तू ग मग
का सोडलेस आता
पाहले असते मला तू
जीव सोडून जाता जाता
✍️ मनोज इंगळे
Maranas jiv nazha
Aata adhir zhala
Jevha mazhya kade g
Tu nasnyaxha nirop aala
Tu nahi mhanun mi hi
nasnyach bet kela
Tu dilelya vachanane mala
jagnyas dhie dela
Sakhe g piryamvada tu
Shariratil pran hoti
Tuzhya aathavanit
Ashru banalet mazhe moti
Mannat petale g
Anginat dhag he aata
Swar ekatech rahile
Tuzhya save geet gaata
Mazhi hoti g tu mag
Ka sodales aata
Pahile aste mala tu
Jiv sodun jatajata
Manoj Ingle
Post a Comment