संसाराची घळी - sansarachi ghali


संसाराची घळी - sansarachi ghali 

संसाराची घळी - sansarachi ghali



पती पत्नीच्या नाते हे अतूट असते एक दुसरी काळजी आणि प्रेम यात अविरत आपणास पाहायला मिळते त्याचे कारण म्हणजे पती पत्नी संबंध होय ज्या मध्ये एक दुसऱ्या विषयाचा आदर आणि सन्मान असतो. पती पत्नी संबंध केवळ शारीरिक नसून ते एक मनोमिलन असते ज्यात दोघे ही एक दुसऱ्याच्या भावनांची जपवणूक करतात काही असेच नाते उलगडणारी ही कविता...

आपल्या संसाराची प्रेमाची 
सवे तुझ्या घळी घालतो मी
तुझ्या कुंतलाच्या लटात 
मोगर्याची कळी माळतो मी

एक दुसऱ्याच्या नयनांचे 
चांदण्यात दिवे जळतो मी
तुझ्या नी माझ्या सोबतीचे
बंध अविरत पाळतो मी 

तुझ्या शृंगाराचा नयनाने
रम्य सोहळा न्याहाळतो मी
पुन्हा पुन्हा तुझ्या वरून 
लोकांच्या नजरा काळतो मी

तूच हृदयात बंद आणि 
जीवनाचा तूच एक छंद आहे
तूच माझ्या भावविश्वी
तुच जिवणाचा गंध आहे 

प्रेम तुच तुच जगणे
तुच आहे या मनी
तुच मैत्री तु सखी ग 
तुच आहे हर दिनी

श्वास श्वावासात तुच हृदयी
तुच हर एक कारणी
तुच माझा संसार स्नेही
तुच दुःख हृदय वारीणी

✍️ मनोज इंगळे

Aaplya sandarachi premachi 
Save tyzhya ghali ghalto mi
Tuzhya kuntalalachya latat 
Mogryachi Kali malto mi

Ek dusryachya naynache
Chandnuat dive jalto mi
Tuzhya ni mazhya sobtiche
Avirat bandh palto mi

Tuzhya shrungarachya naynane
Ramy sohala nyahalto mi
Punha punha tuzhya Varun
Lokanchya najra kalto mi 

Tuch hrudyat band aani 
Jivnacha tuch Chand aahe
Tuch mazhya bhav vishvi 
Tuch jivnacha handh aahe

Prem tuch tuch jagne
Tuch aahe yaa manni
Tuch maitri tu sakhi g
Tuch aahe har dini

Swas swasat tuch hrudayi
Tuch har ek karani
Tuch mazhya sansar snehi
Tuch hruday dukh warini

Manoj ingle



No comments

Powered by Blogger.