Friday, August 4, 2023

Paus aani nisarg - पाऊस आणि निसर्ग- Rain and nature

            

 Paus aani nisarg - पाऊस आणि निसर्ग     

Paus aani nisarg - पाऊस आणि निसर्ग


                     सौंदर्यपूर्ण प्राकृतिक विरेचन निसर्ग अनंत आणि अद्भुत असतो. प्रत्येक ऋतूतूनच निसर्गाच्या नवीन रूपांची विरेचना अनुभवली जाऊ शकते. निसर्ग सुंदर आणि प्रेरक असतो ज्यामुळे पाऊस आणि निसर्ग वर्णन यात आपली रुची असल्याचे सांगणारे आहे. खर तर पाऊस म्हटले की, प्रत्येकाला आपआपल्या परीने साठवुनण ठेवणा-या अनेक आठवणी आठवतील आणि या आठवणीत एकदा तरी आपले मन हरविल्या शिवाय राहणार नाही. पाऊस हा निसर्गाने दिलेले वरदान आहे ज्याने सगळा आसमंत हा हिरवा शालु परीधान करुन एक नववधु सारखी वसुंधरा नटलेली आपणास दिसते. परंतु आजकाल पाऊसच्या अनियमीतते मुळे पाऊस हा पुर्वी सारखा छपरावर संततधार कोसळनारा न राहता त्याचे प्रामाण कमी अधिक होताना आपणास दिसून येते. पावसाच्या अनियमीततेला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. अशाच काही कारणाची आज या लेखात आपण चर्चा करणार आहाेत.


उपकथा: 

           पाऊसाचे आगमन हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यात पाऊस आगमनाची सूरूवात होते. पाऊस हा देवाचे  म्हणजेच वर्षा अवतार  हा वरुण देवच आहे. या वेळी निसर्गाचं सौंदर्य सर्वत्र दिसते. श्रावणाचं पर्व पाऊस आणि निसर्ग ह्या दोन विचारांचे संबंध असे कि श्रावणाचं पर्व सुरू झाल्यानंतर पाण्याची यात्रा सुरु होते. वर्षा ऋतूतलंबित निसर्ग सौंदर्य संध्याचं वर्णन अत्यंत आकर्षक असते. प्राकृतिक सौंदर्य पाऊसाच्या नानाविध सृष्टीसाैदर्यानी नटलेले आपणास दिलसते. या दरम्यान, पाऊसाचे प्राकृतिक सौंदर्य वातावरणात समाविष्ट होऊन आपल्या अस्तित्वाचं भाव सुद्धा तुटतं. 

 

Paus aani nisarg - पाऊस आणि निसर्ग

निसर्गाचे छायाचित्रण: 

                              निसर्ग आणि पाऊस अनुभवाचा अनमोल धागा जीवनाचा कधीही न तुटणारा धागा आहे, परंतु निसर्गाचं छायाचित्रण अनमोल असतं. वर्षा आणि पावसाचं संगम ह्या दोन असाध्य प्राकृतिक प्रवाहाचे सौंदर्य सांगते. प्राकृतिक संतुलन पाऊस आणि निसर्गाचे वातावरण ह्याचे संतुलन त्यांचे विशेषत आकर्षक बनवते. प्राकृतिक सौंदर्याचे छायाचित्रण करणारे पावसाची चाहुल सांगणे म्हणजे एक साधन आहे ज्यामुळे आपल्या आंतरज्ञानाचा संवाद सुद्धा सुरू होताे. निसर्गाचे प्रकृतीचे अनुसंधान वनस्पतींचं वैशिष्ट्य आणि प्राण्यांच्या वागणयातील बदल यावर आधारित अनेक शोध असतात. वनस्पतींचं प्राकृतिक सौंदर्य, त्यांचं प्रजनन आणि वन्यजन्तूंचे संबध ह्या विषयांचे अध्ययन केल्यानंतर निसर्गाचे प्रकृतीचे अनुसंधान मोठ प्रामुखाने आपणास पाहण्यास मीळते. पाऊसाचे आणि निसर्गाचे संरक्षण अत्यंत महत्वाचं आहे. असंख्य वन्यजन्तूंचे आणि पक्षींचे नाश, प्राण्यांच्या प्रजननसंख्येचं कमी होणं, वनस्पतींच विलीन होणं आणि पर्यावरणाचं विकृतीच यांचे कारण पाऊस आणि निसर्गाचा असमतोल यात समतोल राखणे अगदी आवश्यक आहे.

 

Paus aani nisarg - पाऊस आणि निसर्ग

 पाऊस आणि निसर्ग: 

                         पाऊस आणि निसर्गात आपणास जर समतोल राखायचा असेल तर पाऊसाची अनियमीतता आणि त्याचे निसर्गावर होणारे दुष्परीणाम याचा विचार आज आपल्याला करणे क्रमप्राप्त आहे. कारण पाऊसामुळे  आपल्याला कसे फायदे होतील ? पाऊस आणि निसर्ग यांच्या तरंगांचे आणि अस्तित्वाचे भाव आपण घेतल्यास आपल्याला कसा फायदा होईल ह्याचं विचार करणे आवशक आहे. रोज आपणास अशा अनेक घटना एैकण्यास मिळतात की, कुठे पाहाडाचे स्खलन झाले, अतिवृष्टीमुळे पुर आले, जिवितहानी झाली इत्यादी परंतु या सर्व घटनांवर आपण सर्वच नुसती हळहळ व्यक्त करीत असतो परंतु त्याविषयी आत्मचिंतन करीत नाही, त्याचे कारण आपण निसर्गाच्या अनेक सौर्दंर्याचे वर्णन आणि एक सृष्टीचा भाग म्हणुन जगत असतो पण एक निसर्गाचा भाग म्हणुन जगत नाही. भारतातील जिवन पध्दती आणि आपण विदेशातील अंगीभुत आत्मसात करत चाललेल्या पध्दती मुळे आपण निसर्गाकडे वैश्वीक दृष्टीने पाहणे साेडले आहे. भारतीय जिवणपध्दती मध्ये आपणास प्रत्येक सन आणि समारंभामध्ये निसर्ग आणि पाऊस याचे वर्णन आपणास आढळुन येतील त्याचे कारण आपल्या पुर्वजांनी आपल्या रोजच्या जिवणात निसर्ग आणि पाऊस याला प्राधाण्य देण्याचे कार्य केलेल आपणास आढळुन येते. आपण आज विदेशी झाडांना आपल्या बागेत आणि अंगणात जागा दिली आहे परंतु देशी झाड लावणे आवश्यक आहे. दुबई तील पाम सर्वत्र पसरलेला दिसतो पण त्या देशात पाम हे झाड का आहे आणि आपल्या देशात त्याची आवश्यकता आहे का यावर कुणीही विचार करताना दिसत नाही. दुबईतील लोकांप्रमाणे पाम झाडे लावणारा मनुष्य स्वतःला श्रीमंत समजायला लागला व दरातील तुळशीची जागा आज कॅक्टस व विदेशी झाडांनी घेतली.  निसर्ग आणि  पाऊस यांच्यातील होणारा अविरत बदल हे मानव जिवणशैलीवर विपरीत परीणाम टाकणारे आहेत. पाऊस आणि निसर्ग यांच्यातील साधर्म्य साधण्या करीता मानवाला आपल्या पुर्वीच्या लोकांनी ज्या पध्दतीने रोजच्या जिवणात त्याचे नियमन केले त्याच प्रमाणे आपण ही तसे नियमन करणे व पाऊस आणि निसर्गाला आपल्या रोजच्या जीवनमानात सहभागी करणे आवश्यक राहील. याची प्रत्येकाने उरी ईच्छा बाळगावी जेणे करून वसुंधरेला आणि निसर्गाला आपण वाचवू शकू. 

Paus aani nisarg - पाऊस आणि निसर्ग

थोडा विचार थोडी कृती :
                                    हवामान उद्या पाऊस वेळ टेबल काय आहे , पाऊस कधी पडणार, आज रात्री पाऊस पडेल का ? हवामान उद्या पाऊस आहे का ?अश्या एका ना अनेक प्रश्न आपल्याला वर्षा ऋतूत पडतात. याचा आपण विचार केला तर आपल्याला उत्तर मिळेल की या पूर्वी आपण असे कधी वर्षाऋतू मध्ये प्रश्न केलेच नाही असे कळून येणारं कारण पूर्वी पाऊस हा वर्षाऋतू लागताच यायचा नैऋत्य मोसमी वारे वाहू लागले की त्याच्या येण्याची चाहूल आपल्याला लागायची पण आता आपणास प्रश्न आणि चिंता भळसावत आहे.
                                     वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे || या अभंगात संत तुकाराम महाराजांनी वृक्ष हे आपले सोयरे आहेत असे सांगितले आहे. त्या प्रमाणे आपण ही वृक्षांची कत्तल थांबवून आपल्या सोयर्याना वाचविले पाहिजे. वृक्ष जर वाचतील तर जमिनीची धूप होणार नाही. आणि जमिनीची धूप जर झाली नाही तर मृदा राहील आणि मृदा राहली तर वृक्ष राहतील आणि वृक्ष राहला तर पाऊस. अश्याप्रकारे प्रत्येक पाऊल हे पाऊस आणि निसर्ग वाचविण्याच्या प्रयत्ना कडे अग्रेसर होईल जमुळे आपण वसुधैव कुटुंबकम या उक्तीनुसार प्रचीतीची अनुभूती घेऊ शकू.

      ✍️मनोज इंगळे ©️




No comments:

Post a Comment