उणीव - Univ


 

           आई या शब्दाने आपला सर्व ब्रम्हांड व्यापलेला आहे. पण जर आई आपल्या सोबत एक दिवस ही बोलली नाही ना तर ही गोष्ट जिव्हारी लागते. आईची जागा जीवनात कुणीच घेऊ शकत नाही. म्हणून आईचे मन कधीही दुखवू नका आई चे मन दुखवणे म्हणजे ईश्वराचे मन दुखवणे  होय...

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 


मायेच्या उबदार स्पर्शाची जाणीव भासली

आई घरात नसल्याची उणीव भासली 

तिची आभाळ माया उरी साठवुन 

विचारात तिची छबी आठवुन 

पुन्हा पुन्हा डोळ्या समोर ती माय येत होती

कधी मी चाललो अनवाणी जरी मग 

पदर घेता माझ्या शिरी अंगभर

आज मग का उन्हाचा ताप का आठवी ना तुला

खरच का मी इतका उदंड जाहलो बर

 आज ही का माझी तृष्णा शांत ना होई 

का तु न घेई जशी वासरास गाई 

जिवण जगण्यात मजा येत होती 

जेव्हा कधी तु उरी घेत होती 

अजुन मी तो तान्हा बाळाच हाय

जशी तान्हुल्या गवताच धरणी ही माय 

✍️ मनोज इंगळे 


Māyēcyā ubadāra sparśācī jāṇīva bhāsalī


ā'ī gharāta nasalyācī uṇīva bhāsalī 


ticī ābhāḷa māyā urī sāṭhavuna 


vicārāta ticī chabī āṭhavuna 


punhā punhā ḍōḷyā samōra tī māya yēta hōtī


kadhī mī cālalō anavāṇī jarī maga 


padara ghētā mājhyā śirī aṅgabhara


āja maga kā unhācā tāpa kā āṭhavī nā tulā


kharaca kā mī itakā udaṇḍa jāhalō bara


 āja hī kā mājhī tr̥ṣṇā śānta nā hō'ī 


kā tu na ghē'ī jaśī vāsarāsa gā'ī 


jivaṇa jagaṇyāta majā yēta hōtī 


jēvhā kadhī tu urī ghēta hōtī 


ajuna mī tō tānhā bāḷāca hāya


jaśī tānhulyā gavatāca dharaṇī hī māya 


✍️ Manoj Ingle 


No comments

Powered by Blogger.