मृत्यू समीप आला Mrityu samip aala


 

जीवनात कुणाला कधी कुणावर कसे प्रेम होणार याबद्दल सांगू शकत नाही परंतु सगळ्याची प्रेम कहाणी ही पूर्ण होणारच असे नाही कुणाचे प्रेम विरहाचे असे वादळ घेऊन येते की आयुष्य हे नकोसे वाटते आणि अंतिम क्षण जीवन मोजत असते... अश्याच विरह रस असलेली माझी ही कविता...मृत्यू समीप आला.

पुरता सरेना आता 
ही रोजची कहाणी
डोळ्यातील वाहते अश्रू 
हसण्याची नवी बहानी

तू तर कधीच माझ्या 
मना पार झाला 
अंधाऱ्या रातचा हा 
बोचरा गार वारा

मी पूर्ण रात्र जागून 
बघ पार आज केली
नेत्रात माझ्या अश्रु 
दाटून फार गेली

सकाळी अजून माझी 
उशी ओलीच होती
अश्रु कधीच माझे 
बनले नाहीत मोती

मी रात दीन रे तुझिया 
का समीप नसते
नेत्र होतात झरे हे 
एकटी रडत बसते

तू तर खूप होता 
हृदयात साठलेला
भेटीस मी रे तुझिया 
मृत्यू ही गाठलेला

प्रेम होते हे खरे मग 
का तू बईमन झाला
एकदा भेट तू कधी रे 
बघ मृत्यू समीप आला

✍️मनोज इंगळे


Puratā sarēnā ātā 

hī rōjacī kahāṇī

ḍōḷyātīla vāhatē aśrū 

hasaṇyācī navī bahānī


tū tara kadhīca mājhyā 

manā pāra jhālā 

andhāṟyā rātacā hā 

bōcarā gāra vārā


mī pūrṇa rātra jāgūna 

bagha pāra āja kēlī

nētrāta mājhyā aśru 

dāṭūna phāra gēlī


sakāḷī ajūna mājhī 

uśī ōlīca hōtī

aśru kadhīca mājhē 

banalē nāhīta mōtī


mī rāta dīna rē tujhiyā 

kā samīpa nasatē

nētra hōtāta jharē hē 

ēkaṭī raḍata basatē


tū tara khūpa hōtā 

hr̥dayāta sāṭhalēlā

bhēṭīsa mī rē tujhiyā 

mr̥tyū hī gāṭhalēlā


prēma hōtē hē kharē maga 

kā tū ba'īmana jhālā

ēkadā bhēṭa tū kadhī rē 

bagha mr̥tyū samīpa ālā


✍️manoj Ingle 



No comments

Powered by Blogger.